Papaya For Skin चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी असा करा पपईचा वापर, दिसतील आश्चर्यकारक बदल

Spread the love

​पपईतील पोषण तत्त्व

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्व आणि फायबरचा साठा आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायटो व्हिटॅमिनचे प्रमाण भरपूर असते. याव्यतिरिक्त पपईमध्ये फॉस्फरस, मॅग्नेशिअम यासारख्या अन्य पोषक घटकांचाही समावेश असतो. पपईमध्ये पपाईन, कायमोपॅपेन यासारखी रसायने / एंझाइम भरपूर प्रमाणात असतात. अशा प्रकारचे एंझाइम कच्च्या आणि पिकलेल्या पपईमध्येही असते. पण त्वचेसाठी कच्च्या पपईचा उपयोग केल्यास त्वचेवर जळजळ होणे आणि रॅशेज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

(चेहऱ्यावर का लावू नये बॉडी लोशन, काय होऊ शकते नुकसान? जाणून घ्या)

​वृद्धत्वाची लक्षणे

पपईमधील पपाइन नावाचे एंझाइम आपल्या त्वचेतील कोलेजनचा स्त्राव वाढवण्यास मदत करते. कोलेजनमुळे आपली त्वचा निरोगी आणि सतेज राहते. तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे आणि त्वचेतील हायड्रेशन वाढवण्याचंही कार्य कोलेजन करते. पपईमधीलल अन्य अँटी ऑक्सिडंट त्वचेसाठी अँटी-एजिंग एजेंट स्वरुपातही काम करतात. योग्य प्रकारे पपईचा वापर केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.

(चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो, मऊ व चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी असं तयार करा फेस वॉश)

​त्वचेसाठी पपईचे फायदे

पपईमुळे त्वचेला ओलावा मिळतो. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होत नाही. नियमित स्वरुपात पपईचा उपयोग केल्यास चेहरा चमकदार होण्यास मदत मिळते. पपईच्या वापरामुळे वृद्धत्वाची लक्षणेही कमी होण्यास मदत मिळू शकते. चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होऊ शकतात. तसंच मृत त्वचेची समस्याही दूर होते आणि यातील घटक त्वचेवरील पिगमेंटेशन सुद्धा नियंत्रित करतात.

(Diwali 2020 घरच्या घरी मेकअप करताना लक्षात ठेवा या टिप्स)

​सन टॅन कमी करण्यासाठी

  • पपईतील औषधी गुणधर्मांमुळे टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
  • पपाईन, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी त्वचेवरील टॅनिंग दूर करण्याचे कार्य करतात.
  • पपईच्या वापरामुळे मुरुमांची समस्याही कमी होते.
  • याव्यतिरिक्त डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांचीही समस्या कमी होण्यास मदत मिळते.
  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पपईचा वापर केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

(Diwali Skin Care दिवाळीसाठी आतापासूनच घ्या त्वचेची काळजी, कसे करावेत नैसर्गिक उपाय? जाणून घ्या)

​पपईचा त्वचेसाठी कसा करा वापर?

तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण आहारामध्ये पपईचा समावेश करावा. तसंच चेहऱ्यासाठी आपण पपई फेस पॅकचाही उपयोग करू शकता. यासाठी पपईची पातळ पेस्ट करावी आणि चेहऱ्यावर लावावी. या पेस्टमध्ये तुम्ही मध आणि थोडेसे कच्चे दूध देखील मिक्स करू शकता. या फेस पॅकमुळे चेहरा चमकदार होतो. पण चेहऱ्यावर मुरुम असतील याचा उपयोग करणं टाळावे.

(Diwali Ubtan अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी तयार करा ४ प्रकारचे उटणे)

NOTE -लॅटेक्सची अ‍ॅलर्जी असल्यास पपईचा वापर करू नये. महत्त्वाचे म्हणजे त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करण्याची चूक देखील करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *