Pregnancy glow : प्रेग्नेंसीमध्ये महिलांच्या चेह-यावर का येतं चंद्रासारखं तेज?

Spread the love

आई बनण्याच्या प्रवासात खरं तर एका महिलेला शारीरिक आणि मानसिकरित्या ब-याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे सतत काही ना काही समस्या डोकं वर काढत असतात. मुड स्विंग्स तर या काळात पाचवीला पुजलेलं असतं. त्यात उलट्या, मॉर्निंग सिकनेस, थकवा, निद्रानाश, अॅसिडीटी हा त्रास तर वेगळाच असतो. तुम्हाला माहितच असेल महिला आपलं सौंदर्य, आपला सडपातळ बांधा आणि सुंदर बनवणा-या प्रत्येक गोष्टीच्या किती प्रेमात असतात.

पण आई बनण्याचं सुख मिळवण्यासाठी त्या सहज आपलं सौंदर्य त्यागायला तयार होतात. कारण गर्भावस्थेत वजन वाढतं, क्रेविंग वाढते आणि डायटिंग बंद करावं लागतं, पोटाची स्किन खेचली गेल्याने स्ट्रेच मार्क्स येतात, सडपातळ आणि नाजूक बांधा दिसेनासा होतो. तरीही त्या सदैव हसत असतात कारण त्यांची आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार असते. पण योगायोगाने या काळात त्यांच्यासोबत एक गोष्ट सकारात्मक घडते ती म्हणजे या काळात त्यांच्या चेह-यावर एक विलक्षण तेज चमकू लागतं. यामागे अनेक कारणं असू शकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वैद्यकिय क्षेत्रातही याबद्दल बोललं गेलं आहे. चला तर जाणून घेऊया का या काळात चेहरा उजळतो?

कोणत्या महिन्यात उजळतो चेहरा?

असा कोणता ठराविक काळ नाही ज्या काळात चेह-यावर तेज येतं. तरीही शरीरात ज्या काळात सर्वात जास्त बदल होऊ लागतात त्यावेळी चेह-यावरही तेज येण्याची सुरुवात होण्याची शक्यता अधिक असते. हे साधारणत: गर्भावस्थेच्या दुस-या तिमाहीत सुरु होतं. डिलिव्हरी नंतर प्रेग्नेंसी ग्लो निघूनही जातो. तसं पाहायला गेलं तर प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक महिलेच्या शरीरातील हार्मोंन्समध्ये उतार-चढाव येतातच. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की हा अनुभव प्रत्येक महिलेला येईलच. जर तुमच्या चेह-यावर प्रेग्नेंसी ग्लो नसेल आला तर यात चिंतेची काही गोष्ट नाही.

(वाचा :- गर्भपात होण्याची कारणे, लक्षणे आणि संकेत!)

प्रेग्नेंसी ग्लोची कारणे

असं मानलं जातं की प्रेग्नेंसी मध्ये महिला आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी अधिक खुश राहू लागतात. त्यांच्या या आनंदामुळेच चेह-यावर ग्लो येऊ लागतो. आपल्या सुशिक्षित लोकांसाठी ही अंधश्रद्धा असली तरी पूर्वीची लोकं चेह-यावरील तेज पाहून पोटात मुलगा आहे की मुलगी हे ओळखण्याचा प्रयत्न करतात. पण ही निव्वळ एक गंमत असते. शेवटी राम असो वा सीता आपल्यासाठी दोघेही स्त्री-पुरुष नाही तर देव आहेत. अगदी तसंच जे काही देव आपल्याला देईल ते आनंदाने स्वीकारणं शहाण्याचं लक्षण असतं. प्रेग्नेंसीमध्ये खुश राहण्यासोबतच अनेक वैद्यकिय कारणं देखील आहेत ज्यामुळे स्किन ग्लो करते. यामध्ये प्रामुख्याने हार्मोनल चढाव-उतार आणि रक्तप्रवाहाचं काम जास्त आहे.

(वाचा :- गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते कसे करावेत?)

त्वचा तेलकट होणं

काही महिलांचे सीबम ग्लैंड्स जास्त तेल बनवू लागतात. याचं कारण हार्मोनल बदल आहेत. तेल जास्त वाढल्याने ब्‍लड वॉल्‍यूम देखील वाढू शकतं. जर तुमची पहिल्यापासूनच ऑयली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर याचा धोका अधिक वाढतो. यामुळे एक्ने देखील होऊ शकतात. एक्ने सोबतच तेल अधिक वाढल्याने देखील चेह-यावरील तेज वाढू शकते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये वाढतंय अनियंत्रित वजन? मग करा हे उपाय!)

स्किन स्ट्रेचिंग व हिट रॅशेज

रक्त प्रवाह वाढल्याने आणि हार्मोनल बदलांमुळे स्किन स्ट्रेच होऊ लागते. म्हणजेच त्वचा खेचली गेल्याने प्रेग्नेंसी मध्ये त्वचा ग्लो करु लागते. प्रेग्नेंसी मध्ये शरीरात उष्णता वाढून गरम होणं सामान्य गोष्ट आहे. हार्मोंन्समुळेच नाही तर गर्भावस्थे दरम्यान वजन अधिक वाढल्याने सुद्धा शरीरातील उष्णता वाढू लागते. यामुळे हिट रॅशेज आणि हॉट फ्लॅशेज होऊ शकतात. हे दोन्ही त्वचा उजळवू शकतात.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीबद्दल ‘या’ अतिमहत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?)

पहिल्यापासूनच त्वचारोग असणं

जर तुम्हाला पहिल्यापासूनच कोणते त्वचारोग असतील तर प्रेग्नेंसी दरम्यान लक्षणं अधिक गंभीर होऊ शकतात. यामध्ये एक्जिमा, रोसेसिया आणि सोरायसिसचा देखील समावेश असतो. रक्त प्रवाह वाढल्याने आणि हार्मोंन्समुळे त्वचा प्रभावित होऊ शकते. बहुतांश वेळा चेह-यावरील तेजास प्रेग्नेंसी ग्लो देखील समजलं जातं.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये अपु-या झोपेची समस्या भेडसावते आहे? मग करा ‘हे’ उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *