Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?

Spread the love

बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्टायलिश आणि मोहक फॅशन सेन्सची चर्चा केली जाते तेव्हा या यादीमध्ये अंबानी कुटुंबातील महिलांचं नाव अव्वल स्थानी असते. नीता अंबानी यांच्यापासून ते श्लोका मेहतापर्यंत प्रत्येकाने आपल्या ड्रेसिंग स्टाइलने सर्वांना इम्प्रेस केले आहे. स्टायलिश फॅशनच्या या यादीमध्ये लवकरच अंबानी कुटुंबाची होणारी नवी सून राधिका मर्चेंटच्याही नावाची समावेश होईल. राधिकाने आपल्या पारंपरिक अवताराने सर्वांची मने जिंकली आहेत.

दरम्यान, नीता अंबानींना आपल्या या सूनेचे लाड करताना अनेकदा पाहिले गेलं आहे. फोटो काढताना राधिकाचा हात पकडणे, संपूर्ण कुटुंबीयांसोबत फोटो काढणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने नीता आपल्या होणाऱ्या सूनेवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. खूप कमी वेळामध्येच राधिका मर्चेंटही अंबानी कुटुंबीयांसोबत एकरूप झाली आहे. दरम्यान सासू नीता अंबानी आणि वहिनी श्लोका मेहताप्रमाणेच आपल्याही ड्रेसिंग स्टाइलची विशेष चर्चा होईल, राधिका याची पुरेपूर काळजी घेते. आपण राधिकाच्या काही खास डिझाइनर लेहंग्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
(पूजेसाठी नीता अंबानी लाल रंगाचेच कपडे करतात परिधान, यामागे काय आहे कारण?)

​आकाशी रंगाचा लेहंगा

एखाद्या कार्यक्रमाच्या अनुसार कशी वेशभूषा परिधान करावी, याबाबत राधिका मर्चेंटला चांगलीच माहिती आहे. यावरून तुम्ही तिच्या स्टाइल स्टेटमेंटचा अंदाज लावू शकता. कुटुंबातील एका लग्नसोहळ्यासाठी राधिकाने हा आकाशी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. सब्यसाची यांनी डिझाइन केलेल्या या लेहंग्यामध्ये राधिका सुंदर आणि मोहक दिसत आहे. या लेहंग्याच्या ब्लाउजचे डिझाइनही आकर्षक होतं. या लेहंग्यावर तिनं मांग टिका आणि स्टेटमेंट नेकलेस परिधान केले होते.

(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)

​गुलाबी लेहंगा

श्लोका मेहता आणि आकाश अंबानीच्या लग्नातील एका सोहळ्यामध्ये राधिका मर्चेंटने सुप्रसिद्ध डिझाइनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या गुलाबी रंगाच्या चिकनकारी पॅटर्न लेहंग्यावर ऑफव्हाइट सेक्विन विणकाम करण्यात आले होते. यामध्ये पांढऱ्या रंगाचा ब्लाउज आणि पांढरे- गुलाबी रंगाची बॉर्डर असणाऱ्या क्रिस्टल ओढणीचा समावेश होता. राधिका संपूर्ण लुकबाबता सांगायचे झाले तर तिनं कमीत कमी मेकअप केला होता. न्यूड पॅटर्न लिपस्टिक, डायमंड मांग टिका आणि स्टेटमेंट नेकलेस परिधान केलं होतं.

(Nita Ambani नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी मिळतील या पाच गोष्टी)

​केशरी लेहंगा

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नामध्ये राधिका मर्चेंटने प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेला केशरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्यावर हाताने विणकाम करण्यात आले होते. तर ब्लाउजचे गोल्डन पोल्का डॉट डिझाइन तुम्ही पाहू शकता. या स्पेशल लुकसाठी राधिकाने कमीत कमी मेकअपसह शानदार हिऱ्यांचा हार आणि मॅचिंग झुमके मॅच केले होते. राधिकाचा हा डिझाइनर लेहंगा देखील सुंदर आहे.

(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)

​पेस्टल ग्रीन लेहंगा

आपल्या बहिणीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये राधिका मर्चेंटने राहुल मिश्राने डिझाइन केलेला स्कोलोपेड हेमलाइन डिझाइनर लेहंगा घातला होता. यावर तिनं हिऱ्यांचे ईअररिंग आणि बांगड्या मॅच केल्या होत्या. राधिकाचा हा पेस्टल गुलाबी आणि हिरव्या रंगाचा लेंहगा वेटलेस बटर सिल्क ऑर्गेंजा सह डिझाइन करण्यात आला होता. रंगीबेरंगी धाग्यांचा वापर केल्याने स्कर्ट आणि ब्लाउज दोन्ही आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. परफेक्ट लुक मिळावा, यासाठी राधिकाने मॅट पिंक लिपस्टिकसह सॉफ्ट टोन मेकअप केला होता.

(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)

​हलक्या निळ्या रंगातील लेहंगा

राधिका मर्चेंटने ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या लग्नसोहळ्यात फॅशन डिझाइनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. या डिझाइनर लेहंग्यामध्ये राधिका अतिशय सुंदर दिसत होती. राधिकाच्या या लेहंग्यामध्ये क्रिस्टल, चांदीचे मणी आणि सेक्विन वर्कसह वजनदार एम्ब्रोयडरी करण्यात आली होती. ब्लाउजवर देखील पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या क्रिस्टलच्या मदतीने सुंदर डिझाइन तुम्ही पाहू शकता.

(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)

राधिकाचा कोणता डिझाइनर लेहंगा तुम्हाला सर्वात जास्त आवडला, आम्हाला नक्की सांगा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *