Sara Ali Khan सारा अली खानचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार

Spread the love

​साराचा शॉर्ट डेनिम ड्रेस

सैफ अली खान आणि करीना कपूरची भेट घेण्यासाठी सारा त्यांच्या घरी पोहोचली होती. यावेळेस तिनं वेस्टर्न लुकची निवड केली होती. सारानं सुंदर डेनिम ड्रेस परिधान केला होता. कम्फर्टेबल आउटफिट परिधान करायला आवडणाऱ्या साराने डेनिमचे रॉम्पर घातले होते, ज्याची फिटिंग पूर्णतः परफेक्ट वाटत होती. ड्रेस जास्त घट्ट तसंच सैल नसल्याने या आउटफिटमध्ये सारा कम्फर्टेबल दिसत होती. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(वेट लॉसनंतर सारा अली खानच्या फॅशनमध्ये झाला असा ग्लॅमरस बदल)

​साधा पण स्टायलिश अवतार

या ड्रेसची स्पॅगटी स्लीव्ह्ज आणि गोल आकारात नेकलाइन डिझाइन होती. तिचा हा अवतार साधा पण स्टायलिश होता. आउटफिटच्या कोल्ड शोल्डर कट आणि फ्लेअर्ड डिझाइनमुळे साराचा लुक अधिकच स्टायलिश दिसत होता. फ्लेअर्ड डिझाइनमुळे या ड्रेसला सुपर क्युट लुक मिळाला होता. प्लेन डेनिमच्या या ड्रेसमध्ये सारा नेहमी प्रमाणे सुंदर दिसत होती. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(करीना कपूर आणि मलायकाने पुन्हा एकसारखेच कपडे केले परिधान, पाहा फोटो)

​स्टायलिश साराची स्टायलिश पर्स

ब्राइट रंगांची आवड असणाऱ्या सारा अली खानने आपल्या या ड्रेससह रंगीबेरंगी स्लिंग बॅग कॅरी केली होती. या पर्सच्या पुढील बाजूस वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला असून मागील बाजू काळ्या आणि पांढऱ्या रंगाची चेकर्ड प्रिंट डिझाइन दिसत आहे. पर्सच्या स्ट्रॅपवरही मॅटलिक हलक्या जांभळ्या रंगासह ही डिझाइन दिसत आहे. साराने दुसऱ्या हातामध्ये ड्रेसला मॅचिंग असलेली डेनिमची छोटी पर्स देखील कॅरी केली होती. या क्युट पर्सच्या कलरफुल प्रिंटमुळे साराचा ओव्हरऑल लुक अधिक क्युट दिसत आहे. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(करीना कपूरसारखे कपडे घातल्याने मीरा राजपूत झाली होती ट्रोल, लोक म्हणाले…)

​नो मेकअप लुकमध्ये सारा

सारा अली खानने आपल्या हेअर स्टाइलमध्ये कोणत्याही प्रकारे प्रयोग केले नाही. तिने केवळ साध्या पद्धतीने मिडिल पार्टिशन करून केस मोकळे सोडले होते. मेक अपबाबत सांगायचे झाले तर साराने कमीत कमी मेक अप केला होता आणि न्यूड पिंक शेडची लिपस्टिकची निवड केली होती. (फोटो क्रेडिट : योगेन शाह)

(शिल्पा शेट्टीनं आपल्या ६ महिन्यांच्या लेकीसाठी तयार करून घेतला स्पेशल ड्रेस)

​डोळ्यांचा मेक अप

तर दुसरीकडे डोळ्यांचा मेकअप (Eye Makeup) म्हणून तिनं केवळ काजळ लावलं होतं. या ड्रेसवर साराने फुटवेअर देखील साधीच मॅच केली होती. मान्सूनसाठी फुटवेअरची निवड अतिशय परफेक्ट आहे.

(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)

दरम्यान, सारा वेस्टर्न प्रमाणेच पारंपरिक पोषाखामध्येही स्टायलिश दिसते. तिच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिटचे कलेक्शन आहे. ( फोटो क्रेडिट : योगेन शाह)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *