Shanka Prakshalana शंख प्रक्षालन क्रिया करण्याची पद्धत, जाणून घ्या याचे लाभ

Spread the love

प्रांजली फडणवीस
व्यायामाला वेळच मिळत नाही, ही सबब सांगून आपण अनेक व्याधी ओढवून घेतो; पण असे अनेक सोपे व्यायाम प्रकार आहेत, जे आपल्याला अगदी कामाच्या ठिकाणीही करणे शक्य आहे. त्यासाठी मात्र हवा आहे, थोडा वेळ आणि ‘व्यायाम आवश्यक आहे,’ या वाक्यावर विश्वास! असेच काही सोपे व्यायाम प्रकार या सदरातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

शंखप्रक्षालन
शंखात पाणी टाकल्यानंतर ज्याप्रमाणे पाणी चक्राकार फिरून ते बाहेर पडते, त्याप्रमाणे तोंडाने पाणी प्यायल्यानंतर ते पाणी थोड्या वेळानंतर पोटातील मळासकट आतड्यांना स्वच्छ करीत गुदाद्वारे बाहेर फेकले जाते. म्हणून या क्रियेला ‘शंखप्रक्षालन’ असे म्हणतात.
(तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेताय? श्वासोच्छवासाचे सोपे ६ व्यायाम प्रकार)

शंखप्रक्षालन लाभ काय?

सर्वेरोगः प्रजायन्ते जायन्ते मलसंचयात्। आयुर्वेद आणि योग यांच्या मते, मलसंचय होणे हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे. मलसंचयाचा केंद्रबिंदू म्हणजे पचनसंस्था. या पचनसंस्थेला, आतड्यांना आणि त्यातील स्नायूंना मलरहित, सुदृढ करण्याचे कार्य शंखप्रक्षालन करते. मीठयुक्त कोमट पाणी आणि आसनांचा ठराविक क्रम यामुळे आतडी व गुदामधील विशिष्ट स्नायू (Sphincter muscles) शिथिल होतात. त्यामुळे मल बाहेर टाकला जातो.

(Health Care स्नायूंचं संतुलन राखा आणि कंबरदुखी टाळा)

​शंखप्रक्षालनाचे फायदेच फायदे

बद्धकोष्ठता, जीर्ण मलावरोध, आम्लता, गॅस, अपचन, मूळव्याध आणि पचनाच्या अन्य व्याधींसाठी हा रामबाण उपाय आहे. पायांच्या भेगा, कोंडा होणे, केस गळणे, पिकणे, शरीरातील कडकी, अशक्तपणा असे उष्णतेमुळे निर्माण होणारे विकार दूर होतात. मलसंचयामुळे रक्त अशुद्ध होते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमे या क्रियेने कमी होतात. त्वचा कांतिमान होते. शरीरातील अनावश्यक मेद (जाडी) कमी होऊन शरीर हलके व ताजेतवाने होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी केले जाते. परिणामी, मधुमेह नियंत्रित होतो. संधिवात, स्लिप डिस्क, मानेचे विकार, शरीरावरील सूज कमी होते.

(Naukasana नौकासनाचा नियमित सराव केल्यास पोटावरील चरबी होईल कमी)

​कसे करायचे शंखप्रक्षालन ?

सकाळी दोन ग्लास कोमट पाणी चवीनुसार मीठ टाकून तयार करणे. ‘खो-खो’ खेळात बसतात, त्याप्रमाणे दोन्ही पायांवर उकिडवे बसणे. (कागासनाप्रमाणे) दोन्ही पायांत एक फुटाचे अंतर ठेवणे व पाणी पिणे. त्यानंतर पुढील चार आसने करणे…

(वर्क फ्रॉम होममुळे पाठ आणि कंबरदुखी वाढलीय? कंधरासनामुळे दुखणे होईल कमी)

​सर्पासन

– दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर संपूर्ण टेकवून दोन्ही हातांत दोन फुटांचे अंतर ठेवून सर्व शरीर पायाचे चवडे व तळवे यांवर पेलून धरणे.

– कंबरेत न वाकता शरीराचा उतार करणे.

– श्वास भरून घेत डावीकडे तीनदा व उजवीकडे तीनदा वळणे.

(Exercise Tips वयानुसार असू द्या व्यायामाचं प्रमाण)

​उर्ध्वहस्त कटीवक्रासन

– दोन्ही पायांत २ फूट अंतर घेणे.

– हाताची बोटे एकमेकांत गुंफून तळवे छताच्या दिशेने वर करत हात कोपरात सरळ करणे, दंड कानाला लावणे.

– पूर्ण शरीर ताणून घेऊन पोट आत खेचत, श्वास घेत प्रथम डावीकडे तीनदा, नंतर उजवीकडे तीनदा वाकणे.

– श्वास घेऊन एका बाजूस वाकणे. वर आल्यावर पूर्वस्थितीत हळूहळू श्वास सोडणे.

(पोट, ओटीपोटावरील चरबी व कंबरदुखीपासून हवीय सुटका? करा त्रिकोणासनाचा सराव)

समानहस्त कटीचकासन

– वरील आसनाची स्थिती कायम ठेवणे. फक्त हात खांद्याच्या रेषेत सरळ करणे.

– श्वास भरून घेऊन पोट आत खेचणे आणि सावकाश डावीकडे वळणे.

– दोन्ही हातांतील अंतर कायम ठेवणे.

– कंबरेच्या वरचा धडाचा भाग वळवणे. गुडघे व पाय वळवू नये.

– उजवीकडे तीनदा वळणे.

(Yoga Benefits कंबरदुखीपासून हवाय आराम! करा या सोप्या आसनाचा सराव)

​कागासन

– ‘खो खो’प्रमाणे बसणे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवणे.

– ताठ होऊन श्वास घेणे. डावा पाय प्रथम उभा ठेवणे. डावीकडे वळणे.

– उजवा पाय उभा करून श्वास घेत उजवीकडे वळणे.

– ही स्थिती जमत नसल्यास एका पायाचे वज्रासन व दुसरा पाय गुडघ्यात उभा ठेवणे.

(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)

(Health Care नियमित व्यायाम, उपचाराने करा संधिवातावर मात)

NOTE शारीरिक दुखापती टाळण्यासाठी योगप्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसारच योगासनांचा सरावा करावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *