Shardiya Navratri 2020 व्रत करणाऱ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे कुट्टूचे पीठ, जाणून घ्या ६ महत्त्वपूर्ण लाभ

Spread the love

नवरात्रीच्या (Shardiya Navratri 2020) उपवासादरम्यान सर्वाधिक सेवन केले जाणारे खाद्य म्हणजे कुट्टूचे पीठ. कुट्टूच्या पिठापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांची चव आणि महत्त्व देखील वेगवेगळे असते. कुट्टूच्या पिठाचे कित्येक आरोग्यदायी लाभ (Health Care Tips) आहेत. या पिठाद्वारे आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. कुट्टूच्या पिठापासून पुरी, पराठे, भजी, कचोरी, केक यासारख्या पाककृती तयार केल्या जाऊ शकतात.

या पिठाच्या सेवनामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. कुट्टूमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन के, फॉलेट, सोडिअम, खनिजे, कॅल्शिअम, झिंक इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे.
(Navratri 2020 नवरात्रौत्सव 2020 : उपवास करण्याचे सौंदर्यवर्धक व आरोग्यवर्धक लाभ)

​कुट्टूच्या पिठाची पुरी

कशी तयार करायची पुरी

सामग्री : दोन कप कुट्टूचे पीठ, एक चतुर्थांश कप बारीक चिरलेली कोंथिबीर, एक उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्यांची पेस्ट (दोन मिरच्या), एक चमचा तूप, चवीनुसार मीठ, पाणी आणि तेल

विधि : कुट्टूच्या पिठामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरच्यांची पेस्ट, बटाटा, तूप आणि मीठ मिक्स करा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या. मळलेले पीठ १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. पिठाचे छोटे- छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर पुऱ्या तळून घ्या. बटाट्याच्या भाजीसोबत गरमागरम पुरीचा आस्वाद घ्या.

(Health Care Tips न्युट्रिशनिस्टकडून जाणून घ्या कोणते डाएट फॉलो केल्याने दूर होईल डिप्रेशन)

आता जाणून घेऊया कुट्टूच्या सेवनाचे आरोग्यदायी लाभ

​मधुमेहींसाठी लाभदायक

अभ्यासातील माहितीनुसार, उपवासादरम्यान कुट्टूचे सेवन करणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे. कुट्टूच्या माध्यमातून शरीराला फायटोन्युट्रिएंट्स, फायबरचा पुरवठा होतो. फायबरमुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबतच कुट्टूमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म आहेत. जे टाइप २ मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त असल्याचे म्हटलं जातं.

(Navratri 2020 डायबेटिस आहे? तरीही उपवास करताय? ही काळजी नक्की घ्या!)

​रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत म्हणून कुट्टूकडे पाहिलं जातं. हे घटक रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुट्टूचे सेवन केल्यास रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

(पचनाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त आहात का? कोणत्या वेळेस ताक पिणं ठरेल योग्य)

​हाडे मजबूत करण्यासाठी

कॅल्शिअम, प्रोटीन, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस आणि पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे कुट्टू. हाडे, दात निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होणे आवश्यक आहे. हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहाराद्वारे सर्व प्रकारच्या पोषक तत्त्वांची पूर्तता होणे गरजेचं आहे.

(ऑफिसमध्ये किंवा कमी जागेत पवनमुक्तासन कसे करावे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली पद्धत)

​प्रोटीन

निरोगी आरोग्यासाठी प्रोटीन अतिशय महत्त्वाचे आहे. प्रोटीनचा उपयोग एंजाइम, हार्मोन्स आणि शरीरातील अन्य रसायने तयार करण्यासाठीही केला जातो. हाडे, स्नायू, त्वचा आणि रक्त वाहिन्यांच्या विकासासाठी प्रोटीन आवश्यक असते. शरीराच्या सर्व कार्यप्रणाली सुरळीत पार पडण्यासाठी प्रोटीनची मोठ्या प्रमाणात गरज असते.

(भूक लागल्यानंतर या ३ सूपचा घेऊ शकता आस्वाद, जाणून घ्या ही माहिती)

​हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक

कुटूमध्ये नियासिन, फॉलेट, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन बी ६ असतात, हे घटक देखील आरोग्यासाठी पोषक आहेत. कुट्टूमधील ‘व्हिटॅमिन’ रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्याचे कार्य करतात. नियासिनमुळे एचडीएल म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. यामुळे रक्तवाहिन्या अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतात आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

(Health Tips तुम्ही आहारामध्ये फक्त पोळीच खाता का? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी)

NOTE आपल्या आहारामध्ये कुट्टूच्या पिठाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मार्गदर्शनानंतरच आहारामध्ये बदल करावे, अन्यथा करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *