Skin Care तुम्हीही फेशिअल करता का? जाणून घ्या त्वचेवर कसे होतात दुष्परिणाम

Spread the love

टीम मैफल
सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला चकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. प्रमाणाबाहेर फेशियल केल्यामुळे त्वचेसंबंधी विविध समस्या उत्पन्न होऊ शकतात, कारण फेशियल करण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा समावेश असलेले क्रीम वापरले जातात. या केमिकल्सच्या अतिवापरामुळे त्वचा खराब होते.

१. फेशियलच्या वेळी चेहऱ्यावर स्क्रबिंग आणि मसाज केला जातो. चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यास त्वचेवर विपरित परिणाम होतात. चुकीच्या स्क्रबिंगमुळे त्वचेवर लाल डाग पडणे आणि इतर इन्फेक्शन होऊ शकतात. ओव्हर स्क्रबिंगमुळे त्वचेचा बाह्य थर खराब होतो आणि डाग वाढतात.

(Skin Care Routine डाग, रुक्षपणा कमी करण्यासाठी चेहऱ्यावर अशा पद्धतीनं लावा चंदन फेस पॅक)

२. पहिल्यांदा फेशियल करणार असाल, तर स्ट्राँग केमिकल्सचा समावेश असलेले क्रीम वापरू नका. अशा क्रीममुळे चेहरा लाल होऊन सूज येऊ शकते. काहीजणी डाग आणि पिम्पल्स नाहीसे करण्यासाठी फेशियल करतात; परंतु फेशियल केल्यानंतर डाग नाहीसे होतीलच याची खात्री नसते. काही वेळा त्याचा उलटा परिणामसुद्धा होऊ शकतो.

(Skin Care दह्याच्या फेशिअलचे आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल चमकदार)

३. सातत्याने फेशियल केल्यास त्वचारंध्रे उघडी पडतात आणि त्यामुळे पिम्पल्स होण्यची शक्यता असते. फेशियलनंतर तेलकट त्वचेच्या महिलांना पिम्पल्स येणे सामान्य मानले जाते.
(Skin Care त्वचेच्या प्रकारानुसार करा आयुर्वेदिक फेशिअल, चेहऱ्याची अशी घ्या काळजी)

४. वारंवार फेशियलने त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. क्रीममधील केमिकल्सच्या संपर्कामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडली, की चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे फेशियल करताना अधिकाधिक नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या क्रीमची निवड करा.
(साबणाऐवजी वापरा हे घरगुती उटणे, चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यास मिळेल मदत)

Note चेहरा तसंच केसांसाठी कोणत्याही प्रकारचे उपाय करण्यासाठी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण आपल्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. तसंच प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार देखील वेगवेगळा असतो. यामुळे त्वचेचं नुकसान होऊ नये, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *