Skin Care या बियांच्या तेलामध्ये आहे नॅचरल अँटी-एजिंंग फार्म्युला, त्वचेला मिळतात ‘हे’ लाभ

Spread the love

​सूर्याच्या किरणांपासून होतं संरक्षण

आर्गन ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि फ्री रॅडिकल्सपासूनही संरक्षण करतात. नियमित आर्गन ऑइलचा वापर केल्यास त्वचेच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो. याव्यतिरिक्त हायपरपिगमेंटेशनची समस्या देखील दूर होते.

(ग्लुटाथिओनमुळे चेहऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा उजळते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती)

​तेलकट त्वचेपासून मिळते सुटका

तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी काही जण कित्येक महागडे उपाय करतात. याऐवजी आपण आर्गन तेलाचा उपयोग करून पाहा. यातील औषधी घटक त्वचेवरील सीबमचा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात आणण्याचे कार्य करतात. यामुळे त्वचा अधिक तेलकट होत नाही.

(Body Massage हिवाळ्यात शरीराचा मसाज केल्यानं मिळतात हे ५ मोठे आरोग्यदायी लाभ)

​​त्वचा विकार दूर करण्यासाठी

त्वचेचे विकार दूर करण्यासाठी आर्गन ऑइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि फंजीसाइडल गुणधर्म आहेत. हे घटक आपल्या त्वचेचं बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनपासून संरक्षण करतात.

(रात्री झोपण्यापूर्वी २ मिनिटे चेहऱ्याचा ‘या’ नैसर्गिक तेलाने करा मसाज, त्वचेमध्ये दिसतील असे बदल)

​त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी

त्वचेवरील डाग आणि अन्य समस्या दूर करण्यासाठी आर्गन ऑइल प्रभावी उपाय आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे त्वचेशी संबंधित समस्या उदाहरणार्थ सोरायसिस आणि रोसेसिया ठीक करण्यास मदत करतात. चेहऱ्याची त्वचा नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी आपण त्वचेवरील डागांवर थेट आर्गन ऑइल लावू शकता.

(स्ट्रॉबेरी लेग्समुळे मुलींचे पाय दिसतात खराब, ही समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय)

​वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी

त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आर्गन ऑइलचा आपण उपयोग करू शकता. मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या कित्येक स्किन केअर प्रोडक्टमध्ये या तेलाचा समावेश असतो. तुम्ही एखाद्या प्रोडक्टमध्येही हे तेल मिक्स करून त्वचेवर लावू शकता किंवा थेट चेहऱ्यावरही या तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो.

(Foot Care ‘या’ दगडच्या मदतीने दूर करा टाचांच्या भेगा व दुर्गंध, जाणून घ्या योग्य पद्धत)

​​त्वचा राहते मॉइश्चराइझ

मॉइश्चराइझरच्या स्वरुपात आर्गन ऑइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या तेलाचा लोशन, साबण आणि कंडिशनरमध्येही समावेश केला जातो. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक असते. जे त्वचेसाठी लाभदायक असते.

(फेस स्टीमरने पोअर्समधील दुर्गंध काढणं आहे सोपं, चेहऱ्यावर येतो नॅचरल ग्लो)

​मुरुमांची समस्या

शरीरातील हार्मोन असंतुलित झाल्यासही त्वचेवर अधिक प्रमाणात सीबमचा स्त्राव होऊ लागतो. आर्गन ऑइलचा योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे उपयोग केल्यास सीबमचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते. यामुळे मुरुमांची समस्या देखील कमी होते. ज्यामुळे त्वचा नितळ आणि मऊ राहते. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी दिवसातून दोनदा आर्गन ऑइल त्वचेवर लावू शकता.

(हिना खानने शेअर केलं ब्युटी सीक्रेट, चमकदार त्वचेसाठी लावते स्‍ट्रॉबेरी फेस पॅक)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *