Skin Care Tips चेहरा धुताना तुम्ही देखील या चुका करता का? जाणून घ्या या ५ गोष्टी

Spread the love

चेहरा योग्य पद्धतीने स्वच्छ धुणे, स्किन केअर रुटीनमधील हा महत्त्वपूर्ण भाग आहे. तज्ज्ञ मंडळी देखील दिवसभरात दोन वेळा चेहरा धुण्याचा सल्ला देतात. काही जण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच फेस वॉश खरेदी करतात. पण बहुतांश लोक कळत-नकळत चुकीचं फेस वॉश वापरतात. तुमच्या या चुकीमुळे चेहऱ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

त्वचेशी संबंधित सर्व समस्या प्रत्येक वेळेस केवळ धूळ, माती, प्रदूषण किंवा पौष्टिक आहाराच्या अभावामुळेच उद्भवतात, असे नाही. तर एखादं चुकीचे ब्युटी प्रोडक्ट वापरल्यानेही त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की, जे फेस वॉश आम्ही विकत घेतले आहे. ते आमच्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही? हे कसं ओळखावे. यासाठी तुम्हाला आपल्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांचा नीट अभ्यास करावा लागेल. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.
(Natural Hair Care केस आणि टाळूवर रात्रभर लावून ठेऊ शकता हे हेअर मास्क)

​त्वचा अधिक संवेदनशील होते

संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी आपल्या त्वचेची भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या चेहऱ्यासाठी फेस वॉश विकत घेताना चुकीची निवड करणं टाळावे. अन्यथा त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्वचेवर जळजळ होत असल्यास किंवा खाज सुटत असल्यास आपण सौम्य स्वरुपातील फेस वॉशचा वापर करावा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नैसर्गिक सामग्रींचा समावेश असलेले फेस वॉशचा उपयोग करण्यावर भर द्या.

(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत)

​त्वचा दिसू लागते निर्जीव

फेस वॉश त्वचा एक्सफोलिएट करण्याचे काम करते. पण जर चेहरा स्वच्छ धुतल्यानंतरही त्वचेवर नैसर्गिक चमक दिसत नसेल तर तुम्ही चुकीचे फेस वॉश वापरत आहात हे लक्षात घ्यावे. काही लोकांचा असा समज असतो की, फेस वॉशने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचा काही वेळासाठी कोरडी आणि निस्तेज दिसू लागली, तर संबंधित प्रोडक्ट आपल्या त्वचेसाठी योग्य प्रकारे काम करत आहे. पण हा समज चुकीचा आहे. याउलट फेस वॉशमधील घटक त्वचेसाठी हायड्रेटिंग असणे आवश्यक आहे.

(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)

​कमी वयात वृद्धत्वाची लक्षणे दिसणे

कमी वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही वापरत असलेले ब्युटी प्रोडक्ट तपासून घेणे आवश्यक आहे. अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतील, अशा सर्व गोष्टी स्वतःपासून दूर ठेवा. चुकीचे फेस वॉश वापरण्याच्या सवयीमुळेही वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. कदाचित ही लक्षणे तुम्हाला चेहऱ्यावर लगेचच दिसणार नाहीत, पण जसजसे वेळ जाईल. तसतसे तुम्हाला आपल्या त्वचेवर फरक जाणवू लागतील.

(Hair Care घरच्या घरी तयार करा लसूण हेअर पॅक, जाणून घ्या फायदे)

​T-Zoneची त्वचा ताणली जाणे

t-zone-

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात. पण बऱ्याचदा चुकीचे फेस वॉश वापरल्यासही त्वचेवरील ओलावा कमी होतो. तसंच ज्यांची त्वचा आधीपासूनच कोरडी आहे, त्यांच्या ओठ आणि नाकाजवळ काळे डाग दिसण्यास सुरुवात होते. चुकीच्या फेस वॉशमुळे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ लागतात. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि पीएच पातळी वाईटरित्या प्रभावित होते.

(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)

​मुरुमांची समस्या

काही जण मुरुमांच्या समस्येमुळे अक्षरशः त्रासलेले असतात. कितीही उपाय केले तरीही चेहऱ्यावरील मुरुम कमी होत नाही. यासाठी ही लोक सतत फेस वॉश बदलत राहतात. मुरुम कमी करण्याचा दावा करणारे फेस वॉश मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. हे प्रोडक्ट आपल्या त्वचेवरील पोअर्स स्वच्छ करण्याचे काम करतात, असा त्यांचा समज असतो. पण बऱ्याचदा असे प्रोडक्ट आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. यातील केमिकलमुळे आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेलाचा होणारा स्त्राव कमी होतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा आणि तेज कमी होते.

(Methi For Hair केसांसाठी वापरुन पाहा मेथीपासून तयार केलेले हे सहा पॅक)

NOTE : चेहऱ्याशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी तसंच एखादे ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *