Skin Care Tips तेलकट त्वचेसाठी बेस्ट आहेत टोमॅटोचे ३ उपाय, असा करा वापर

Spread the love

स्वयंपाकघरामध्ये आढळणारे टोमॅटो स्वयंपाकाची चव वाढवण्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही लाभदायक आहे. तेलकट त्वचा (Skin Care Tips) असणाऱ्यांसाठी टोमॅटो (Tomato Benefits For Face) एक रामबाण उपाय आहे. टोमॅटोतील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावर जास्त प्रमाणात होणारा सीबमचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम देखील कमी होतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोमॅटोतील पोषण घटकांमुळे त्वचेवरील ओपन पोअर्समध्ये जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होते. हे पोअर्स पुन्हा बंद होण्यासाठीही मदत मिळते. ज्यामुळे व्हाटइहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका होते. चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर (Skin Care Routine) करायचे असतील तर टोमॅटोचा वापर कसा करावा, जाणून घेऊया याची सविस्तर माहिती
(Skin Care Tips निरोगी त्वचेसाठी लिंबूपासून घरामध्येच तयार करा टोनर)

​टोमॅटो चेहऱ्यावर लावा

स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर त्वचेसाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता. यासाठी अर्धा टोमॅटो घ्यावा आणि मुरुमांवर हलक्या हाताने कापलेल्या टोमॅटोनं मसाज करावा. त्वचा रगडली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते. मसाज केल्यावर तासाभरानंतर आपला चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. थोड्या वेळानं चेहऱ्यावर मॉइश्चराइझर देखील लावावे.

(Skin Care दह्याच्या फेशिअलचे आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल चमकदार)

​टोमॅटो त्वचेसाठी कसं ठरते लाभदायक

टोमॅटोमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आणि मॅलिक अ‍ॅसिड देखील असते. हे दोन्ही तत्त्व आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचे कार्य करतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या कमी होऊन पोअर्स (रोमछिद्रे) देखील बंद होण्यास मदत मिळते.अशा प्रकारे आपली त्वचा चमकदार, मऊ आणि उजळ दिसू लागते.

(Skin Care मासिक पाळीमध्ये मुरुम का येतात? जाणून घ्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी)

​टोमॅटो, दही आणि बेसन फेस पॅक

मुरुमांमुळे चेहऱ्यावरील पोअर्स खूप मोठे दिसू लागतात. ही समस्या कमी करण्यासाठी टोमॅटोचा ज्युस आणि दही एकत्र करून लावल्यास त्वचेला भरपूर फायदे मिळतील. ओपन पोअर्स कमी होण्यास मदत मिळेल. तर बेसनमुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होईल.

(VIDEO चमकदार, मऊ आणि डागविरहित त्वचा हवीय? प्या हा स्पेशल घरगुती ज्युस)

​कसे तयार करायचे फेस पॅक

एका वाटीमध्ये दोन मोठे चमचे टोमॅटोची पोस्ट, एक मोठा चमचा दही आणि एक मोठा चमचा बेसन घ्या. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. हे फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. फेस मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहऱ्यावर चांगले परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा.

(Skin care त्वचेसाठी उपाय करताना या चुका करू नका, होतील गंभीर दुष्परिणाम)

​टोमॅटो आणि काकडी स्किन टोनर

टोमॅटो आणि काकडीमध्येही त्वचेसाठी पोषक असलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे गुणधर्म आपल्या त्वचेचं पीएच संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. टोमॅटो आणि काकडी एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि मुरुमांची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

(Natural Skin Care त्वचेचा रंग उजळण्यासाठी प्या गरम पाणी, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे)

​कसे तयार करायचे स्किन टोनर?

टोमॅटो आणि काकडी किसून घ्या व त्याचा रस काढा. यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर टोमॅटो काकडीचा ज्युस लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे स्किन टोनर चेहऱ्यावर लावावे. यातील पोषण तत्त्वांमुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होईल. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसेल.

(Skin Care त्वचेवर येईल इन्स्टंट ग्लो, जाणून घ्या अरोमाथेरपी फेशिअलचे फायदे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *