Skin Care Tips या ब्युटी प्रोडक्टवर करू नका खर्च, जाणून घ्या त्वचारोग तज्ज्ञांचे तुमच्या फायद्यासाठीचे मत

Spread the love

आपला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. चमकदार त्वचेसाठी महिलावर्ग शेकडो उपचारांचे प्रयोग करून पाहतात. यासाठी बाजारातही वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट उपलब्ध आहेत. जे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचा दावा करतात. महिलांमध्ये या प्रोडक्टची सर्वात जास्त क्रेझ पाहायला मिळते. योग्य विचार न करताच कित्येक जणी महागडे ब्युटी प्रोडक्ट खरेदी देखील करतात.

पण बहुतांश स्किन केअर आणि ब्युटी प्रोडक्टमध्ये केमिकलचा समावेश असतो. यामुळे आपल्या त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. या पार्श्वभूमीवर त्वचेला लाभ मिळतील, अशाच प्रोडक्ट्सचा नेहमी वापर करावा. कोणकोणत्या ब्युटी प्रोडक्टवर पैसा खर्च न करण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ देतात, जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.
(Methi For Hair लांबसडक व मजबूत केसांसाठी वापरा मेथी, काही दिवसांतच दिसतील आश्चर्यकारक बदल)

​स्ट्रेच मार्क क्रीम

बाजारात उपलब्ध असणाऱ्या कित्येक ब्युटी क्रीम स्ट्रेच मार्क कमी करण्याचा दावा करतात. पण महिनोंमहिने अशा क्रीमचा वापर करून स्ट्रेच मार्क कमी होत नाहीत. स्ट्रेच मार्कच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञ लेझर ट्रीटमेंट करण्याचा सल्ला देतात. यामुळे कोलेजन वाढते आणि स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळते. दरम्यान, वॉटर प्रूफ मेकअपच्या मदतीनेही स्ट्रेच मार्क लपवले जाऊ शकतात.

(चमकदार त्वचा आणि काळ्याशार केसांसाठी क्रीम व शॅम्पू नव्हे, तर लावा हे रामबाण नैसर्गिक तेल)

​​ट्रेंडी अँटी-एजिंग प्रोडक्ट

अँटी- एंजिग प्रोडक्टमध्ये रेटिनोइड्स आणि अल्फा-हायड्रॉक्सी एसिड असते. हे घटक हळूहळू कोलेजन तयार करतात आणि फाइन लाइन तसंच पिगमेंटेशनची समस्या दूर करतात. पण हे घटक त्वचेसाठी चांगल्या प्रकारे काम करतीलच याबाबत कोणतीही ठोस वैज्ञानिक माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच फॅशनेलबल अँटी एजिंग प्रोडक्टवर खर्च करणं टाळा.

(Hot Oil Hair Massage कोमट तेलानं मसाज केल्यास थांबेल केसगळती, जाणून घ्या योग्य पद्धत)

​महागडे क्लींझर

मेकअप काढण्यासाठी क्लींझरचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि दुर्गंध स्वच्छ करण्यासाठीही क्लींझरची मदत घेतली जाते. पण यासाठी महागड्या क्लींझरची आवश्यकता नाही. क्लींझिंग ब्रशचाही तुम्ही वापर करू शकता. यामध्ये अल्ट्रासोनिक वायब्रेशन असतात, जे त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे कार्य करतात. महत्त्वाचे म्हणजे हे प्रोडक्ट जास्त महागडे देखील नसते.

(Hair Care या १० पद्धतींनी केसांना लावा नारळाचे तेल, केसांमध्ये दिसतील आश्चर्यकारक बदल)

​महागडे सनस्क्रीन

त्वचेसाठी चांगल्या दर्जाचेच सनस्क्रीन लोशन वापरले जाणे आवश्यक आहे. कारण आपल्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. धूळ, माती, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण होणे गरजेचं आहे. पॅकिंग आणि सुगंधाकडे आकर्षित होऊन सनस्क्रीन लोशन विकत घेऊ नका. यामुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण होत नाही. यासाठीच नेहमी चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन वापरावे.

(Tips For Hair Care मेहंदीच्या पानांमुळे पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर, जाणून घ्या फायदे )

​​स्‍किन पोअर्स कमी करणारे प्रोडक्ट

पोअर- स्किनिंग प्रोडक्टमध्ये सिलिकॉन असते. जे थोड्या वेळासाठी त्वचेवरील ओपन पोअर्स कमी करण्याचे काम करते. मुरुम आणि सन टॅनमुळे चेहऱ्यावर ओपन पोअर्सची समस्या निर्माण होते. यासाठी सर्व प्रथम मुरुम, सन टॅन इत्यादी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. या समस्या दूर झाल्यानंतर रोमछिद्रे आपोआप कमी होण्यास मदत मिळते.

(साबणाऐवजी वापरा हे घरगुती उटणे, चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यास मिळेल मदत)

​खर्च करणं टाळा

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी महागडे प्रोडक्ट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. प्रोडक्ट विकत घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या. केमिकलयुक्त प्रोडक्टवर खर्च करू नये.

Note चेहरा तसंच केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे त्वचेच्या प्रकारानुसार ब्युटी प्रोडक्टचा वापर करावा. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो.

(Skin Care चमकदार त्वचेसाठी आंघोळ करण्यापूर्वी ५ मिनिटे लावा बेसन फेस स्क्रब)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *