Sonam Kapoor ‘या’ स्टायलिश ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी सोनम कपूरला केलं ट्रोल, म्हणाले…

Spread the love

​सोनमची हटके फॅशन

कोणतीही नवीन स्टाइल सर्वात आधी कॅरी करणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनमची अशीच काहीशी ओळख आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पण कधी-कधी अतरंगी दिसणारे पोषाख परिधान करून त्यास स्टाइल म्हटल्यानंही सोनमला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. एका स्टायलिश ड्रेसमुळे सोनम पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. नुकतेच तिनं न्यूझीलंड आणि लंडनमधील फॅशन डिझाइनर ‘Emilia Wickstead’ने डिझाइन केलेला काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. खरंतर या ड्रेसमध्ये सोनम सुंदर दिसत आहे. पण नेटकऱ्यांना तिचा हा अवतार फारसा आवडला नाही.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)

​हॉलिडे कलेक्शन

सोनम कपूरने आपली मैत्रीण आणि फॅशन डिझाइनर Emilia Wickstead चे हॉलिडे कलेक्शन प्रमोट करण्यासाठी या ड्रेसची निवड केली होती. सोनम कपूरच्या या ड्रेसमध्ये आपण V शेप नेकलाइन सह पफी स्लीव्ह्ज आणि काळ्या व पांढऱ्या रंगाचं स्ट्राइप डिझाइन पाहू शकता. या ड्रेसवर सोनम कपूरने लंडनमधील ज्वेलरी डिझाइनर Jessica McCormack ने डिझाइन केलेले पर्ल स्टेटमेंट चोकर घातले होते.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)

सोनम कपूरचा आकर्षक लुक

हा मोनोटोन अटायर कॉटन फॅब्रिकसह Polyester कपड्यामध्येही डिझाइन करण्यात आलाय. यामुळे पोषाखाला प्रचंड आकर्षक मिळाल्याचे तुम्ही पाहू शकता. ड्रेसला परफेक्ट लुक देण्यासाठी कमरेभोवती बेल्ट देखील जोडण्यात आला आहे. सोनमने कमीत कमी मेकअप करण्यावर भर दिल्याचं दिसतंय. या लुकसाठी तिनं लाइट टोन लिपस्टिक, बीमिंग हाइलाइटर, मिडल पार्टेड हेअरस्टाइल केली होती. साध्या मेकअपमध्येही सोनम कपूर सुंदर दिसत होती.

(भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांच्या ग्लॅमरस पत्नी, ज्या आहेत जगभरात प्रसिद्ध)

नेटकऱ्यांनी ड्रेसची ‘झेब्रा कॉसिंग’शी केली तुलना

सोनम कपूरने या स्टायलिश ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ट्रोलर्सनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. काही जणांनी तिच्या या ड्रेसची झेब्रा क्रॉसिंगसह तुलना केली. तर काही नेटकऱ्यांनी सोनमच्या या लुकवर स्पष्टपणे नापसंती दर्शवली. तर काहींनी या महागड्या ड्रेसला ‘चादरीचं कापड’ म्हणत सोनम कपूरला ट्रोल केलं. दरम्यान स्टायलिश अवतारामुळे ट्रोल होण्याची सोनमची ही पहिलीच वेळ नाही.

(आलिया भटचा खास डिझाइनर लेहंगा, लहान मुलांनी तयार केलेल्या या आउटफिटवर आहेत ‘हे’ शब्द)

यापूर्वीही अनेकदा स्टाइल किंवा एखाद्या प्रतिक्रियेवरून नेटकऱ्यांनी या अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *