Supta Vajrasana Benefits अपचनाच्या समस्येमुळे आहात त्रस्त? करा सुप्त वज्रासनाचा सराव

Spread the love

निरोगी आरोग्य सर्वांनाच हवे असते, पण त्यासाठी आरोग्याची काळजी घ्यायला पुरेसा वेळ कोणाकडेच नसतो. रोजची धावपळ, ऑफिसच्या कामांचा ताण यामुळे व्यायाम, योगासनांचा सराव करणे शक्य होत नाही. पण फिट राहण्यासाठी पौष्टिक आहाराप्रमाणेच नियमित व्यायाम करणं देखील आवश्यक आहे. निरोगी आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीर सक्रिय ठेवणं गरजेचं आहे. बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कित्येक जण पोटाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त असतात.

पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहावी, यासाठी नियमित सुप्त वज्रासनाचा सरावा करावा. या आसनाच्या सरावामुळे शरीराच्या अन्य अवयवांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. सुप्त वज्रासनाच्या सरावामध्ये पोट, छाती, मांड्या, घोटे, गुडघे इत्यादी अवयवांमध्ये चांगला ताण जाणवतो. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
(Health Care Tips आर्ट थेरपीशी गट्टी फायदेशीर!)

​सुप्त वज्रासन साधण्याची कृती

योग मॅटवर वज्रासनामध्ये बसावे. यानंतर मांडीवरील हात एक-एक करून काढा आणि तळव्यांजवळ ठेवा. हाताची बोटे पायांच्या दिशेनं करून ठेवा आणि दोन्ही तळहात जमिनीवर ठेवा. यानंतर कमरेपासून डोक्यापर्यंतचे शरीर मागील बाजूस न्या आणि हातांचा आधार घेऊन शरीर किंचितचे तिरपे ठेवा. या स्थितीत गुडघे आणि घोटे यावर ताण जाणवेल. यानंतर उजव्या हातावर भार देऊन डावा हात डाव्या पायाजवळ ठेवून डावे कोपर जमिनीवर ठेवा.

(Health Care मूड चांगला राहण्यासाठी करा या ७ गोष्टी)

​क्षमतेनुसार आसनाचा सराव करावा

यानंतर उजवा हात उजव्या पायाजवळ आणा व उजवे कोपर जमिनीवर ठेवा. यानंतर आपले डोके मागील बाजूस न्यावे. या स्थितीमध्ये गुडघे, घोटे आणि मांड्यावर जास्त ताण जाणवतो. यानंतर आपले डोके जमिनीवर ठेवावे. दोन्ही हात शरीराजवळ एका रेषेमध्ये ठेवा.

(शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करा फक्त १५ मिनिटांचा व्यायाम, मिळतील भरपूर लाभ)

​आसनाची अंतिम स्थिती

यानंतर उजवा हात वर न्या आणि कोपरामध्ये दुमडा. डोकं वर करा आणि उजवा तळहात डाव्या खांद्याखाली ठेवा. नंतर डावा हात वर करून कोपरामध्ये दुमडा. डावा तळहात आपल्या उजव्या खांद्याखाली ठेवावा. या स्थितीमध्ये गुडघे एकमेकांजवळ तसंच जमिनीवरच असावेत. ही झाली सुप्त वज्रासनाची अंतिम स्थिती. आपल्या क्षमतेनुसार अंतिम स्थितीमध्ये राहावे. ज्याप्रमाणे आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये पोहोचलात त्याच उलट क्रमाने आसन सोडावे.

– आसनांचा सराव करताना श्वासोच्छवास रोखून धरू नये. तीन वेळा हे आसन करावे.

(Poha And Nutritions नाश्त्यामध्ये कांदे पोहे खाल्ल्यास मिळतील हे ६ फायदे)

​आसन करताना कोणती काळजी घ्यावी

– घोटे आणि गुडघ्यांचे सांधे ताठ असल्यास आसनाचा सराव हळूहळू करावा. कोणत्याही प्रकारे घाई करू नये. महत्त्वाचे म्हणजे आपल्या क्षमतेनुसारच आसनाचा सराव करावा.

– आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये गुडघे एकमेकांजवळ ठेवणे शक्य नसल्यास त्यामध्ये अंतर ठेवू शकता. नियमित सराव केल्यास तुम्ही सहजरित्या सुप्त वज्रासनाची अंतिम स्थिती ग्रहण करू शकता.

– आसन करताना अवयवांवर ताण जाणवू लागल्यास आरामदायी स्थितीमध्ये यावे.

(बद्धकोष्ठता किंवा अतिसारामुळे आहात त्रस्त? दोन्ही समस्यांपासून या ड्रायफ्रुटमुळे मिळेल आराम)

सुप्त वज्रासन कसे करायचे? पाहा व्हिडीओ

हे आसन कोणी करू नये

तीव्र पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, घोटे आणि गुडघे दुखत असल्यास या आसनाचा सराव करू नये. तसंच हर्निया इत्यादी पोटाशी संबंधित समस्या असल्यास हे आसन करणं टाळावे. योगासनांचा सराव करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे.

( पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन )

सुप्त वज्रासनाचे लाभ

या आसनामध्ये पोटाला चांगल्या पद्धतीने ताण (Stretch) मिळतो. यामुळे पोटाच्या आतील अवयवांनाही याचा फायदा होतो. रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. अपचन, गॅस, इत्यादी पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास या आसनामुळे मदत मिळते. पोट – ओटीपोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. घोटे आणि गुडघ्यांच्या स्नायूंचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. रक्ताभिसरण सुधारते. स्नायूंमधील लवचिकता वाढते.

NOTE – योगासनांचा सराव करण्यापूर्वी योग प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. तसंच शारीरिक दुखापती टाळण्यासाठी योग प्रशिक्षकासमोरच आसनांचा सरावा करावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *