Time Management प्राधान्यक्रम ठरवा, नियोजन करा!

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
आयुष्यात निर्णय घेण्याच्या क्षमतेला अधिक महत्त्व असतं. कधी-कधी लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे निर्णय घेता येत नाहीत. कित्येकदा निरर्थक गोष्टींवर वेळ घालवत असतो. अशा वेळी प्राधान्य ठरवणं गरजेचं असतं. त्याच बरोबर कोणत्या गोष्टीला किती वेळ आणि महत्त्व द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे. यासाठी नियोजन करणं, विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं गरजेचं असतं. हे कसं करता येऊ शकतं ते आजच्या लेखातून पाहू या.

(तोडा वेदनेची शृंखला! व्याधींना दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय)
नियोजन महत्त्वाचं
एखादी गोष्ट करायची राहूनच जाईल या भीतीमुळे बऱ्याच जणांना आपल्या कामाची नोंद ठेवायची सवय असते. ही चांगली सवय आहे. ज्यांना गोष्टींची नोंद करायची सवय नसते ते कधीकधी महत्त्वाच्या गोष्टी सहज विसरतात. त्यामुळे प्रत्येकानं कामांची नोंद करायला हवी. यामुळे लक्षातही राहतं आणि नियोजन करणं सोपं जातं. यासाठी एक चेकलिस्ट बनवायची सवय ठेवा. शांतपणे बसून कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या लिहून काढा. एखादी गोष्ट विसरली तरीही ती चेकलिस्ट बघून लक्षात येऊ शकते. चेकलिस्टचा दुसरा प्रकार म्हणजे प्रधान्यक्रम ठरवून यादी बनवणं. हाही प्रकार फायद्याचा असतो. त्यानुसार नियोजन करुन एकेक काम मार्गी लावा.

(तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेताय? श्वासोच्छवासाचे सोपे ६ व्यायाम प्रकार)
विचारांवर ठेवा नियंत्रण
सतत सुरू असलेल्या विचारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. क्षणिक आनंद किंवा दुःख झाल्यास त्यात बराच काळ अडकून राहणं योग्य नव्हे. तुमच्या ध्येयापासून लक्ष विचलित होऊ देऊ नका. ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे त्यांचा विचार सारखा मनात असल्यास ते पूर्ण करण्याचा मार्ग सोपा होतो.

न सुटणारं कोडं
अवघड गोष्टींचा जास्त विचार केल्यास ताण येतो. काही वेळ विश्रांती घेतल्यास तुम्ही समस्या सोडवू शकता. भविष्यात स्थैर्य हवं असेल तर आधी विचारांमध्ये स्थिरता आणणं गरजेचं आहे. तज्ज्ञ सांगतात की, स्मार्टफोनचा वापर शक्य तितका टाळा. कामात व्यग्र असताना दर दहा मिनिटांनी फोन बघितल्यास लक्ष विचलित होतं. परिणामी, कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही.
(Health Care मणक्यांना होणारा वातरोग, जाणून घ्या उपचाराची पद्धत)

तुमचे मार्ग तुम्हालाच शोधायचे आहेत. पण, काही सोप्या गोष्टींच आचरण केलं आणि काही निरर्थक गोष्टी टाळल्यास विचारांमध्ये प्रगल्भता येते. आत्मविश्वास वाढतो. चिकाटी वाढते. अवघड प्रश्न सोडवण्यासही मदत होते.

संकलन- साक्षी चावरे, एस. के. सोमय्या कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *