Tips To Sleep Tight शांत झोप हवी असेल तर हे एक काम नक्की करून पाहा

Spread the love

​तुम्हाला नेमकं काय करायचं आहे?

हे काम केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत मिळले. महत्त्वाचे म्हणजे यामुळे आपला मेंदू शांत राहील. नेमके काय करायचे, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. अंथरुणात जाण्यापूर्वी आपले पाय पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. कॉटनच्या कापडाने पाय पुसून घ्या. यानंतर मोहरीच्या तेलाने आपल्या पायांचा मसाज करा. दोन ते तीन मिनिटांसाठी पायाचा मसाज करून घ्यावा. पायांचा नियमित मसाज केल्यास तुम्हाला असे मिळू शकतील लाभ

(Work From Home वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय? करा या ५ महत्त्वाच्या गोष्टी)

​पायाच्या तळव्यांमध्ये असतात अ‍ॅक्युप्रेशन पॉइंट

आपल्या पायाच्या तळव्यांमध्ये संपूर्ण शरीराचे अ‍ॅक्युप्रेशन पॉइंट असतात. पायांच्या तळव्यांचा मसाज करताना हे सर्व पॉइंट्सवर दबाव पडतो. ज्यामुळे शारीरिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आपल्याला मानसिक शांतता लाभते. यामुळे चांगली झोप येण्यासही मदत मिळते.

(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)

​चिरतरुण राहण्यासाठी

प्रत्येक दिवशी तुम्ही झोपण्यापूर्वी ( Tips for better sleep) तळव्याचा मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास चिरतरुण राहण्यास मदत मिळेल. याचा अर्थ असा की तुमचे दात, दृष्टी आणि शरीराचे सांध्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. पण यासाठी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

(शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करा फक्त १५ मिनिटांचा व्यायाम, मिळतील भरपूर लाभ)

​चष्मा लागणार नाही

झोपण्यापूर्वी (better sleep tips) नियमित मोहरीच्या तेलाने पायांचा मसाज (foot massage at home) केल्यास तुमची दृष्टी देखील चांगली राहण्यास मदत मिळेल. पण केवळ एक किंवा दोन आठवड्यांतच याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील, असे त्याचा अर्थ होत नाही. यासाठी तुम्हाला नियमित हा उपाय करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला आरोग्यदायी लाभ मिळतील.

( नाश्त्यामध्ये काय खाताय? हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक)

​पचन प्रक्रिया सुधारते

नियमित योग्य पद्धतीने पायांचा मसाज करणाऱ्या लोकांच्या पचन प्रक्रियेची क्षमता चांगली असते. याबाबत तुम्ही आपल्या डॉक्टरांकडूनही माहिती घेऊ शकता. तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन पायांचा मसाज कसा करावा, याबाबतची योग्य माहिती घ्यावी. ज्यामुळे तुम्हाला भरपूर आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. मसाज केल्याने शारीरिक थकवा, ताणतणाव आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. आपल्या शरीराला आराम मिळतो. तळव्यांच्या मसाजमुळे शरीरातील पेशी देखील दुरुस्त होतात. यामुळे त्वचेवरही नैसर्गिक चमक येते.

(शांत झोप हवीय? मग या ७ गोष्टी कायम ठेवा लक्षात)

NOTE : प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या निराळ्या असतात. यामुळे कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा अथवा तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *