Turmeric Benefits For Skin डागविरहीत आणि नितळ चेहरा हवाय? तर अशी वापरा हळदीची पेस्ट

Spread the love

आयुर्वेदामध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीराला आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूने फायदे मिळतात. याच कारणामुळे आपल्या स्वयंपाकामध्येही हळदीचा वापर आवर्जून केला जातो. यामुळे स्वयंपाकाची चव वाढते. हळदीतील अँटी ऑक्सिडेंट आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. हळदीतील पोषक तत्त्वांमुळे चेहऱ्यावरील मुरुम, डाग (Skin Care Tips ) इत्यादी समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हळद सहजरित्या आढळते. फेस पॅक किंवा उटण्यामध्ये याचा वापर केल्यास आपल्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. महागड्या क्रीम वापरण्याऐवजी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये हळदीचा समावेश करून पाहा. हळदीमुळे आपल्याला कशा प्रकारे सौंदर्यवर्धक लाभ मिळतात. जाणून घेऊया याबाबतची माहिती.
(Cucumber For Skin: नितळ त्वचा हवीय? मग असे तयार काकडीच्या सालीपासून फेस पॅक)

जखमेचे निशाण दूर करण्यासाठी

तुमच्या शरीरावर एखाद्या जखमेचे व्रण आले असल्यास एक वाटीमध्ये हळद, लिंबू रस आणि दुधाची मलई मिक्स करा. याची जाडसर पेस्ट तयार करा. हळदमध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी एखाद्या ब्लीचिंग एजंट प्रमाणे काम करतात. त्वचेवर ज्या ठिकाणी डाग आहेत तेथे नियमित हा लेप लावा. लेप सुकल्यानंतर पाण्याने त्वचा धुऊन घ्या. सलग १५ दिवस हा उपाय केल्यास डाग कमी होण्यास मदत मिळेल.

(Skin Care सर्व प्रकारच्या त्वचेसाठी परफेक्ट आहेत हे ७ DIY फेस पॅक)

​वृद्धत्वाची लक्षणे

हळदमध्ये कर्क्युमिनोइड नावाचे घटक असते. जे शरीराला अँटी ऑक्सिडेंटचा योग्य वापर करण्यास मदत करतात. अँटी ऑक्सिडेंट आपल्या त्वचेच्या पेशींचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात. वृद्धत्वाची लक्षणे, सुरकुत्या, डाग इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही हळद, कच्चे दूध आणि अंड्यातील पांढरा भाग वाटीमध्ये एकत्र घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. या लेपमुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. तसंच आपली त्वचा देखी सैल पडत नाही.

(Hair Care घनदाट, लांबसडक केसांसाठी वापरा बेसन आणि दही हेअर मास्क)

​कोरडी आणि रुक्ष त्वचा

कोरडी त्वचा अतिशय संवेदनशील असते. कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये हळदीचा समावेश करा. यासाठी हळदमध्ये नारळाचे तेल मिक्स करा. दोन्ही सामग्रींपासून जाडसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये आश्चर्यकारक बदल दिसून येतील. या उपायामुळे तुमच्या त्वचेला ओलावा मिळतो. यामध्ये तुम्ही मधाचेही काही थेंब मिक्स करू शकता.

(कोरफड आणि हळदीचे मास्क चेहऱ्यासाठी आहे बेस्ट, त्वचेला मिळतील मोठे फायदे)

​स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी

प्रेग्नेंसीनंतर महिलांच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्सचे निशाण येतात. ही समस्या कमी करण्यासाठी वाटीमध्ये हळद, लिंबू रस, एक चमचा एरंडेल तेल, दोन व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मिक्स करा. ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क्स आले आहेत, तेथे हे मिश्रण लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून दोन ते तीन हा उपाय करावा. हळदीतील औषधी गुणधर्मामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल.

(मुरुमांचे डाग, निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी असे तयार करा पपई फेस पॅक)

​त्वचेचा रंग उजळण्यासाठी

हळदीच्या फेस पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग, काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा मध, एक चमचा कच्चे दूध, १/४ चमचा हळद आणि लिंबू रस मिक्स करा. हे फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. कमीत कमी २५ मिनिटांसाठी फेस पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. काही दिवसांतच तुम्हाला आपल्या चेहऱ्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

(Cucumber For Skin: नितळ त्वचा हवीय? मग असे तयार काकडीच्या सालीपासून फेस पॅक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *