VIDEO जेव्हा देसी गर्ल प्रियंकाने परदेशी महिलेला शिकवलं केवळ ३ पिनच्या मदतीनं साडी नेसणं

Spread the love

​परदेशी महिलेला शिकवली साडी नेसण्याची पद्धत

केवळ तीन पिनच्या मदतीने साडी कशी नेसावी? याची योग्य पद्धत प्रियंका चोप्रा एका परदेशी महिलेला शिकवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता. दरम्यान प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra Saree) एका मासिकासाठी मुलाखत देत होती आणि याचवेळेस हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे म्हटलं जातंय. तिनं मासिकाच्या एडिटरला स्वत: साडी नेसवली. या महिलेला साडी नेसवताना प्रियंकाने केवळ तीन सेफ्टी पिनचा वापर केला. तसंच अगदी काही मिनिटांतच देसी गर्लने या परेदशी नारीला साडी नेसवली.

(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)

​साडीविषयी प्रियंकाने म्हटलं होतं की…

या मुलाखतीदरम्यान प्रियंकाने फॅशनसंदर्भात चर्चा करत साडी या पोषाखावरील आपले विशेष प्रेम व्यक्त केलं होतं. भारतातील सर्वात प्रसिद्ध वेशभूषा साडी असल्याचे तिनं सांगितलं होतं. प्रियंकाला वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसणे आणि निरनिराळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये उपलब्ध असलेल्या साड्यांची प्रचंड आवड आहे. तिनं पुढे असंही म्हटलं होतं की, साडी नेसल्यानंतर खूप छान वाटते. साडी नेसल्यानंतर मोहकता, स्त्रीत्व आणि सामर्थ्याची जाणीव होते.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

​वॉर्डरोबमध्ये आहेत शानदार साड्या

वेगवेगळ्या कौटुंबिक सोहळ्यांमध्येही प्रियंकाला साडी नेसणं पसंत आहे. तिच्या वॉर्डरोबमध्ये कित्येक प्रकारच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन देखील आहे. दरम्यान साडी नेसण्यासाठी प्रियंकाला विशेष कार्यक्रमांचीही आवश्यकता भासत नाही. एकदा तिनं इन्स्टाग्रामवर साडी लुकमधील मोहक फोटो शेअर केला होता. या निळ्या रंगाच्या साडीमध्ये प्रियंका चोप्रा सुंदर दिसत होती. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, ‘साडी नेसण्याची खूप इच्छा होती, म्हणून ही साडी नेसली’

(‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना’, अली फजलच्या टी-शर्टनं वेधून घेतलं लक्ष)

​जेव्हा साडीसोबत प्रयोग करणं पडलं होतं महाग

एकीकडे प्रियंका चोप्राचे साडीवरील विशेष प्रेम, तिचे साडी लुकमीधल फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जातो. पण साडीसोबत एखादा प्रयोग केल्यास चाहत्यांच्या रागाचाही तिला सामना करावा लागतो. एका फोटोशूटसाठी प्रियंका चोप्राने सोनेरी रंगाची साडी नेसली होती.

(जेव्हा ऐश्वर्या रायनं नेसली होती अशी साडी, तिला पाहण्यासाठी झाली होती गर्दी)

पण ही साडी तिनं ब्लाउज शिवाय नेसल्याचे या फोटोशूटमध्ये दिसत होतं. पारंपरिक पोषाखासह असा प्रयोग करणं चाहत्यांना अजिबात आवडले नाही. तिचा हा अवतार पाहून नेटिझन्सनी सोशल मीडियावर तिला वाईटरित्या ट्रोल केले होतं.

(इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *