Weight loss: कोण म्हणतं भात खाल्ल्याने वजन वाढतं? भात बनवण्याची ‘ही’ पद्धत एकदा ट्राय कराच!

Spread the love

हल्ली प्रत्येकाच्या तोंडून आपल्याला एकच समस्या ऐकायला मिळती ती म्हणजे वजन वाढलंय (weight gain) काय करु यार? खरं तर हल्लीच्या तरुणांचं झपाट्यानं वाढणा-या वजनामागे खराब लाईफस्टाईल, अपूर्ण झोप, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, असंतुलित आहार, व्यसन, एक्सरसाईज अथवा योगची कमी या गोष्टी कारणीभूत आहेत. आता वजन वाढल्यावर काही जणांना ते कमी करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही आणि वजन कमी करणं हे एक स्वप्न राहून जातं. म्हणूनच आज आम्ही असे साधेसोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही वाढत्या वजनावर सहज नियंत्रण मिळवू शकता.

आपण नेहमी ऐकतो की भात खाल्ल्याने वजन वाढतं आणि डाएटिंग करायची असेल तर भात सोडावा लागेल पण हे साफ चुकीचं आहे. शिवाय काही लोकांना वजन कमीही करायचं असतं व भात खाणंही सोडायचं नसतं. अशा लोकांसाठी खास आज आम्ही असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला भातही सोडावा लागणार नाही व वजनही झटक्यात कमी होईल.

भात खाण्याच्या २ पद्धती

खूप लोकांची अशी समजूत किंवा गैरसमज असतो की भाज खाल्ल्याने वजन वाढेल आणि भात सोडला नाही तर वजन नियंत्रणात राहणारच नाही. जे की पूर्णपणे चूकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला भात अजिबात सोडायचा नाहीये, तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे भात शिजवण्याची व खाण्याची पद्धत फक्त बदलायची आहे. असं मानलं जातं की भाता मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. कॅलरीजमुळेच वजन वाढतं किंवा असं म्हटलं जाऊ शकतं की कॅलरीज वजन वाढवण्याचा मुख्य स्त्रोत ठरतात. यामुळे वेट लॉस करणारे लोक भात आहारातून काढून टाकतात. पण भारतातच नाही तर जगभरात भारताचे दिवाने लोक आहेत. पण भारतात भात जास्त खाल्ला जातो. म्हणजे भाताशिवाय जेवणाला पूर्णविराम मिळतच नाही.

(वाचा :- ‘या’ ५ पदार्थांचा करा डाएटमध्ये आवर्जून समावेश, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी भासणार नाही डॉक्टरांची गरज!)

भात शिजवण्याची पद्धत

भात शिजवण्याची देखील एक पद्धत असते ज्यामुळे भातातील अतिरिक्त कॅलरीज कमी केल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तर हे काम तुम्ही स्वत:च्या स्वयंपाकघरात देखील करु शकता. यासाठी तुम्ही अर्धा कप नॉन फोर्टिफॉईड सफेद तांदूळ घ्या आणि त्यामध्ये एक चमचा नारळाचे/कोकोनट ऑईल तेल मिक्स करा. आता हे तांदूळ गरम पाण्यात उकळण्यासाठी टाका. आता गरम पाण्यात तांदूळ जवळ जवळ ४० मिनिटे शिजवायचे आहेत. तांदूळ चांगले शिजल्यानंतर जवळ जवळ १२ तास ते फ्रिजमध्ये ठेवायचे आहेत. आता १२ तासांनंतर फ्रिजमधून काढून तुम्ही हा भात गरम किंवा थंड जसा तुम्हाला आवडतो तसा खाऊ शकता.

(वाचा :- अक्षय कुमारने दिल्या लठ्ठपणा दूर करण्यासाठी खास टिप्स, तुम्हीही दिसाल अक्षयसारखे यंग व फिट!)

कॅलरीज कशा कमी होतात?

आता तुमच्या मनात हा प्रश्न जरुर आला असेल की तांदूळ शिजवताना त्यातील कॅलरीजची मात्रा कमी कशी होते? आम्ही तुम्हाला याचं उत्तर देतो. जेव्हा भात शिजवून थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवला जातो तेव्हा या दरम्यान भातात ग्लूकोज मोलिक्यूल्स टाइट बॉन्ड्स बनतं ज्याला रेसिस्टेंट स्टार्च असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की अशाप्रकारे भात खाल्ल्याने आपलं डायजेस्टिव सिस्टम म्हणजेच पचन तंत्र याला फुल अब्जोर्ब करत नाही. म्हणजेच पूर्णत: शरीरात शोषून घेत नाही. साध्या सोप्या भाषेत सांगायला गेलं तर संपूर्ण कॅलरीज शरीरात शोषून घेत नाही. अशा पद्धतीने शिजवलेला भात आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतो. कारण यातील तत्वांना शरीर शरीर ग्रहण करत नाही.

(वाचा :- वजन व पोट करायचं आहे कमी? मग फॉलो करा ‘हे’ ५ नियम!)

नारळ/कोकोनट ऑईलची खास भूमिका

भात अशाप्रकारे शिजवताना नारळ तेलाची किंवा कोकोनट ऑईलची खास भूमिका किंवा योगदान असतं. नारळाच्या तेलात मिडीयम-चेन फॅटी अॅसिड असतं जे की वजन किंवा चरबी कमी करण्यास मदत करतं. भात शिजवण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत पण ही पद्धत इतर पद्धतींच्या तुलनेत दस पटीने उत्तम मानली जाते. अशा पद्धतीने शिजवलेला भात खाऊन तुम्ही शरीरातील जवळ जवळ ६०% कॅलरीज सहजपणे कमी करु शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अशा पद्धतीने शिजवलेला भात पुन्हा गरम केलात तरी त्यातील कॅलरीज जराही वाढत नाहीत.

(वाचा :- तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी खाता ‘हे’ पदार्थ? मग पडू शकता भयंकर आजारी!)

भात खाण्याच्या अजून काही पद्धती व टिप्स

भाज आवडत्या भाज्या टाकून बनवा कारण भाज्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. पोट दीर्घकाळ भरलेले राहते व वजन आपोआप कमी होते. सफेद तांदळाऐवजी ब्राऊन तांदूळ खा, यामध्ये सफेद तांदलापेक्षा अधिक फायबर व कमी कॅलरीज असतात. तांदळात इतर डाळी मिक्स करुन भात बनवा कारण डाळींमध्ये कॅलरीज कमी असतात व शरीराला प्रथिने जास्त मिळतात. भात तयार करताना त्यात जिरे किंवा मिरपूड टाकल्याने शरीरात चरबीचे प्रमाण कमी होते. तांदळाची इडली-सांबर करुन खा, यामुळे पोट लवकर भरते.

(वाचा :- मानसिक आरोग्य जपण्यासाठी व तणावमुक्त राहण्यासाठी ट्राय करा ‘हे’ साधेसोपे उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *