Weight Loss Journey ‘माझं १०३ Kg वजन होतं, ६ महिने डाएट फॉलो करून ३४ Kg वजन घटवलं’

Spread the love

​वजन कमी करण्यासाठी असा घेतला निर्णय

वजन वाढल्याने (Weight Loss Tips) काही समस्या निर्माण होऊ लागल्या. यामुळे संपूर्ण दिवसभर माझ्या शरीरामध्ये सुस्तपणा आणि आळस वाढत होता. वजन कमी करण्यासाठी मी नेहमी विचार करायचो. पण अखेर कोव्हिड १९ लॉकडाउनदरम्यान आरोग्याप्रतीचा माझा दृष्टीकोन बदलला. आरोग्य निरोगी असेल तर आयुष्यात तुम्ही काहीही करू शकता, याची जाणीव मला झाली.

(नियमित या वेळेस हळदीचं पाणी प्या, मिळतील भरपूर आरोग्यदायी लाभ)

​माझे डाएट प्लान

वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान तयार करणं अतिशय आवश्यक आहे. यामुळे मला बरीच मदत मिळाली.

सकाळचा नाश्ता : मी सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेल्या मूगमध्ये लिंबू रस, कापलेला कांदा, काकडी, आणि टोमॅटो मिक्स करून खात असे.

दुपारचे जेवण : दुपारच्या जेवणामध्ये ओट्स, नाचणी किंवा गव्हाची पोळी, भाजी आणि ४०० ग्रॅम दूध आणि दह्याचे सेवन करत असे.

रात्रीचे जेवण : दलिया, ओट्स आणि दूध

(नाश्त्यामध्ये काय खाताय? हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक)

प्री आणि पोस्ट वर्कआउट

प्री-वर्कआउट मील : २० भिजवलेले बदाम, दोन अक्रोड, एक अंजीर, दोन खजूर आणि एक चमचा अळशीच्या बिया

पोस्ट-वर्कआउट मील: एक कप ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी, भाजलेले मखाणे

माझे वर्कआउट रुटीन

वजन घटवण्यासाठी मी नियमित २५ किलोमीटर सायकल चालवत असे.

(पोटावर झोपण्याची सवय आहे? या ६ समस्या उद्भवण्याची शक्यता)

​कशी मिळाली प्रेरणा

सकाळी उठल्यानंतर मी दररोज आपले वजन तपासून पाहत असे. माझ्या प्रयत्नांना यश मिळत होतं आणि वजन घटत होते. वजन कमी होत असल्याचे पाहूनच मला प्रेरणा मिळत होती.

(Fox Nuts Benefits वजन घटवण्यापासून ते त्वचा निरोगी राहण्यापर्यंत मखाण्यांमुळे मिळतील हे लाभ)

​वजन वाढीमुळे आरोग्याच्या समस्या

माझे वजन झपाट्याने वाढत होते. यामुळे मला माझे शरीर जड आणि आळसावलेले वाटत होते. माझ्या आवडीचे आउटफिट मी परिधान करू शकत नव्हतो. लोकांच्या विचित्र प्रतिक्रिया ऐकाव्या लागत असे. यामुळे माझ्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ लागला.

लाइफस्टाइलमध्ये केले बदल

वजन घटवण्यासाठी मी डाएट प्लानसह जीवनशैलीमध्येही काही बदल केले. मी पहाटे ५.३० वाजता उठायचो आणि रात्री १०.३० पर्यंत झोपत असे.

(अपचनामुळे त्रस्त आहात? समस्या दूर करण्यासाठी वाचा ही फायद्याची माहिती)

Note तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहार आणि वर्कआउटचे नियम फॉलो करावे. अन्य कोणाचेही डाएट तसंच वर्कआउट प्लान फॉलो करण्याची चूक करू नये.

(इंग्रजीमध्ये हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *