Weight Loss Story या व्यक्तीचे वजन होते १०२Kg, असं घटवलं १२Kg वजन

Spread the love

​वजन कमी करण्याचा निर्णय असा घेतला

माझे वजन १०२ किलोग्रॅम एवढे झाले होते. वजन वाढीचे मला कधीही टेंशन आले नाही. मला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. यासाठी मी औषधोपचार करण्यास सुरुवात केले. पण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा कधीही गांभीर्यानं विचार केला नाही. पण अचानक एके दिवशी मला जाणीव झाली की आपण आपल्या आयुष्यासोबत चुकीचे वागत आहोत. यानंतर मी एका आहारतज्ज्ञाशी संपर्क साधला आणि त्याच दिवसापासून वजन घटवण्याचा निर्णय घेतला.

(Weight Loss Diet वजन घटवण्यासाठी नेमकं काय खावे, फळे की भाज्या?)

​वजन घटवण्यासाठी माझे डाइट प्लान

वजन कमी करण्यासाठी सुरुवातीपासूनच एकच डाएट प्लान फॉलो केल्यानं मला बरीच मदत मिळाली.

सकाळचा नाश्ता : पोहे, उपमा, थेपला, कमी कॅलरी असलेले चिला किंवा दूध असे खाद्यपदार्थ नाश्तामध्ये असायचे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी कधी कधी नाश्त्यामध्ये केवळ फळ खात असे.

दुपारचे जेवण : दोन किंवा तीन पोळ्या, सॅलेड, हिरव्या भाज्या, दही किंवा ताक, ब्राउन राइस, डाळ आणि व्हेजिटेबल करी.

(Weight loss चहाऐवजी प्या हे ड्रिंक, एका आठवड्यात कमरेवरील चरबी होईल कमी)

​प्री आणि पोस्ट वर्कआउट मील

अल्पोपहार : सुकी भेळ किंवा ओट्स

रात्रीचे जेवण : थेपला, बाजरीची पोळी, नॉर्थ किंवा साउथ इंडियन खाद्यपदार्थ

प्री-वर्कआउट मील: सुका मेवा, चणे, ग्रीन टी

पोस्ट-वर्कआउट मील : प्रोटीनसह थ्रेप्टिन बिस्किट आणि एक वाटी फळे

(फिट राहण्यासाठी प्या कोबीचे सूप, एका आठवड्यात कमी होऊ शकते ४ Kg वजन)

​वर्कआउट प्लान

वजन कमी करण्यासाठी मी नियमित १० किलोमीटर धावत असे. सोबत ५ ते ६ किलोमीटर फिरत देखील असे. लॉकडाउनदरम्यान फिट राहण्यासाठी मी योगासनांचा अभ्यास केला. यासोबतच मी काही व्यायाम प्रकार देखील करण्यास सुरुवात केली.

(Weight Loss वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? प्या गूळ व लिंबूचे आरोग्यवर्धक पेय)

​वजन कमी करण्यासाठी कशी मिळाली प्रेरणा?

वजन कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले तेव्हा मला माझ्या शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसू लागले. हे बदल पाहून माझ्यातील आत्मविश्वास वाढू लागला. मित्र आणि नातेवाईकांनीही माझे भरपूर कौतुक केलं. अशा पद्धतीने मी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडवले. आता मी मॅरेथॉनमध्येही धावू शकतो.

(Weight Loss Tips ५ दिवसांत कमी होईल बेली फॅट, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स)

(इंग्रजीमध्ये हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *