Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज


फॅशन ही ऋतूनुसार बदलत असते. हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांना फार मागणी असते. या ऋतूत फॅशनप्रेमींना स्टायलिंग करण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असतात. हल्ली लोकरीच्या कपड्यांमध्ये नवनवीन पर्याय पाहायला मिळतायत. कॅज्युअल वेअर्ससाठी पुलोवर्स, रिब्ड, नायटेड फॅब्रिकच्या कपड्यांना पसंती दिली जाते. तुम्ही जर हट के लुकचे चाहते असाल तर हिवाळ्यातले फॅशन ट्रेंड्स नक्की फॉलो करा.

० पुलोव्हर्स आणतील लुक

सध्या तरुणींमध्ये पुलोव्हर पॅटर्नची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. पुलोव्हर्सचा फायदा म्हणजे हे कपडे तुम्ही कोणत्याही ऋतूत आरामात घालू शकता. पुलोव्हर टॉप्स वर्षानुवर्षं टिकतात. शिवाय, ते खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असतात. या पॅटर्नमध्ये असणारे भन्नाट डिझाइन्स आणि रंग तरूणींना आकर्षित करत आहेत. तरुणांमध्येही पुलोव्हर्सची फॅशन जोमात आहे. शिमर लुक असणारे पुलोव्हर टॉप्स तरुणींना कमालीची भुरळ घालत आहेत. को-ऑर्ड पुलोव्हर्सची सध्या चलती पाहायला मिळतेय.

– फुल स्लीव्हज, क्रॉप, क्रॉप टॉप, कॅमी, टँक, पिप्लम, ब्लाउज टॉप यामध्ये पुलोव्हर पॅटर्न पसंत केलं जात आहे.

(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)


० ट्रेंडी स्वेट टॉप्स


हिवाळा आणि स्वेट टॉप्स हे समीकरण जुनं आहे. पण, बाजारात सध्या स्वेट टॉप्समध्ये स्टायलिश पर्याय दिसतायत. पूर्वी स्वेटर केवळ हिवाळ्यापुरतंच मर्यादित होते. पण, आता कॅज्युअल आणि पार्टीवेअर्ससाठीसुद्धा स्वेट टॉप्सना पसंती दिली जातेय. विशेषतः क्रॉप टॉप्स तरुणींचं लक्ष वेधून घेतायत. स्वेट टॉप्समध्ये फर पॅटर्नला प्रचंड मागणी आहे. टोपी स्टायलिंगमध्ये भर घालते. सध्या ट्रॅक सूट्सची चलती पाहायला मिळतेय.

(चोकर्सची चलती! ट्रेंडनुसार निवडा स्टायलिश नेकलेस)


० हट के नेक-स्लीव्हज


फॅशन करताना व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशा नेक पॅटर्नची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. रिब्ड टॉप्स आणि टर्टल नेक म्हणजेच हाय नेक यांचं गणित उत्तम जुळतं. टर्टल नेकवर छानसं नेकपिस तुमच्या लुकला चार चांद लावेल. विंटर कलेक्शन टॉप्समध्ये भरपूर प्रकारचे नेक आणि स्लीव्हज डिझाइन्स बाजारात सहजरित्या उपलब्ध होतात.

– नेकमध्ये वी, ऑफ शोल्डर, कॉलर तर स्लीव्हजमध्ये बलून, कोल्ड शोल्डर, पफ स्लीव्हजना पसंत केलं जातं.

(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)


० स्कार्फ दिसेल शोभून


परफेक्ट विंटर लुक करताना स्कार्फला विसरून कसं चालेल? साधारण कपड्यांनाही स्टायलिश आणि हट के लुक देण्याचं काम स्कार्फ करतो. फॅशन जगतात स्कार्फला भरपूर महत्त्व आहे. स्कार्फमुळे तुम्ही आकर्षक तर दिसताच. शिवाय, स्कार्फमुळे नेकपिस किंवा श्रग परिधान करण्याचीही गरज भासत नाही. हिवाळ्यात लोकरीच्या टोपीचीही क्रेझ पहायला मिळते. कारण स्कार्फ गळ्यासोबतच कानाभोवती गुंडाळण्याचा पर्याय असतो. तुमच्या आऊटफिटनुसार स्कार्फची निवड करा. तुमच्या कपाटात किमान एक तरी मफलर किंवा लोकरीचा स्कार्फ असणं गरजेचं आहे, असं स्टायलिस्ट सांगतात.

० जॅकेट्स भारी

फॅशनप्रेमींना कायम भुरळ घालणारा प्रकार म्हणजे जॅकेट. जॅकेट तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवतं. हिवाळ्यात परफेक्ट विंटर लुक पाहिजे असेल तर पुलोव्हर किंवा रिब्ड पॅटर्नच्या जॅकेट्सची निवड अचूक ठरेल. तरुणांमध्ये झिपर्सची चलती असते. हिवाळ्यात घराबाहेर पडताना हलकंफुलकं जॅकेट तुमच्या सौंदर्याला नक्कीच चार चांद लावेल. तुमच्या पेहरावावर शोभेल अशा जॅकेटची निवड करावी.


० अ‍ॅक्सेसरीज फॅशन


केवळ पेहरावातच नाही तर अ‍ॅक्सेसरीजमध्येसुद्धा विंटर फॅशनची सरशी पाहायला मिळतेय. बाजारात लोकरीच्या धाग्यांनी विणून तयार केलेले चोकर लक्ष वेधून घेतायत. काही टॉप्ससोबत मॅचिंग चोकर मिळतं. या ऋतूसाठी मुलायम आणि कम्फर्टेबल चपलांची गरज असते. आजकाल फर सँडल्सना पसंती मिळतेय. लोकर किंवा ब्रेडेड बॅग्सचा पर्यायही निवडू शकता. शिवाय, रंगबेरंगी सुतळीच्या बॅग्सही आकर्षक दिसतात.

टिप्स

– हिवाळ्यात ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्सवर सेल असतात. त्याचा लाभ घ्यावा. यामुळे घराबाहेर जाऊन खरेदी करण्याची गरज भासत नाही.

– लक्षात ठेवा, ऑनलाइन सेल कितीही भुरळ घालत असले तरीही विनाकारण खरेदी करणं टाळा.

– लोकरीच्या कपड्यांमध्ये केलेली गुंतवणूक वाया जात नाही. कारण, लोकरीचे कपडे वर्षानुवर्षं टिकतात.

– पुलोव्हर किंवा रिब्ड कपड्यांची खासियत म्हणजे हे पॅटर्न कायम ट्रेंडमध्ये असतात. म्हणजेच लोकरीच्या कपड्यांची फॅशन कधीही आउटडेटेड किंवा जुनी होत नाही.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *